Thursday, August 27, 2015

!! जिवलगा !!!




!! जिवलगा !!!



प्रीतीचे हें स्नेहबंध , 
जपायचे आहे जिवलगा !!
आपल्या मधले अंतर 
मिटवायचे आहे जिवलगा !!! 


वचन दिलेस तू मला , 
कसे विसरू जिवलगा !!
जन्मो जन्मीची सोबत 
तूझीच असेल जिवलगा  !!!


अबोला आणि रुसवा 
किती सोसावा जिवलगा !! 
नशीबी आलाय दुरावा . 
कळलेच नाही जिवलगा !!!

ओढ तूझी हया जीवा , 
कुठे शोधू तुज जिवलगा !!
काळाने घेरण्या आधी . 
भेटशील का जिवलगा ??



1 comment:

  1. प्रीतीचे हें स्नेहबंध ,

    ReplyDelete