Tuesday, December 1, 2015

!! कल्पनांचा सागर !!




!! कल्पनांचा सागर !!
***********************
स्वप्ने बघण्याची शक्ती जागृत असेल   
तर नेहमी चंगले नवे सामर्थ्य मिळेल !! 

हे सामर्थ्य आपल्या जवळ भरपूर आहे   
याची आपल्याला कधी कल्पनाही नसेल !!!

आयुष्यात न वापरलेला शक्तीसाठा 
प्रत्येका जवळ सुप्त अवस्थेत असतो !!

जर हा शक्तीसाठा उपयोगात आणला 
तर स्वप्ने साकार व अपूर्व यश मिळतो !!!
    
मन म्हणजे विविध कल्पनांचा सागर असते 
आपल्या कल्पनाच आपले भवितव्य घडवते !!

सुख दुःख आपल्या मनाच्या ताब्यात असते 
आपल्याच स्वप्नातून सुख दुःख निर्माण होते !!!

असंतोष, विसंवाद, द्वेष, मत्सर, निराशा 
अस्वस्थता, चिंता, काळजी, भीती नसेल !!

तर अवर्णीय सोंदर्य, आनंद, समाधान 
प्रेमभावना, आपुलकी चमकत असेल !!!

@ राज पिसे 

Sunday, November 29, 2015

!! गीत जीवनाचे !!



!! गीत जीवनाचे !!
*********************
नजरेतून झारल्या आसवांना ,
लयधुंद करते सारयांच भवनांना !!

आनंद दुःख यांचे नाते जुळेना ,
गीत जीवनाचे गाते परी कळेना !!!

@ राज पिसे 

!! खेळ संपला !!




!! खेळ संपला !!
******************
पाहता पाहता खेळ संपला 
छळते स्वप्न अजूनही मला !!

विजून बघतो जाळ आतला 
वाट बघतो त्याचं वळणाला !!!

@ राज पिसे 

Tuesday, November 17, 2015

!! नज़रे !!



!! नज़रे !!
*********
झुकी नज़रो से 
      ..इकरार मत करना,
 …नज़रे उठा कर 
        .....इंकार मत करना...

........वादे तो इंसान  
..........तोड जाता है 
............ओर यादे इंसान 
..............को तोडती है !!

         राज पिसे 

Monday, November 16, 2015

!! मधुर रसे !!



!! मधुर रसे !!
***************
.
क्षणात आपले क्षणात परखे दिसे ,
कळी कालची आज फूल होऊनी हसे !!
.
वेळी अवेळी नभाचे रंग हि बदलते कसे , 
नात्यात हि वसते प्रेमाचे स्नेहाचे मधुर रसे !!! 
.
@ राज पिसे 

Thursday, November 12, 2015

!! शिणला जीव !!



!! शिणला जीव !!
****************

आठवणी काढता 
तुजवीण राहता ,
वाट तुझी बघता 
अश्रू माझे वाहता !!

थकले माझे डोळे 
रात्रंदिन जागता ,
शिणला जीव माझा 
तुला न भेटता !!!

@ राज पिसे 

Tuesday, November 10, 2015

!! ते लहानपण !!




!! ते लहानपण !!
****************

मोकळे असाचे रान ,
चिमुकल्या पावलांना !!

लळा लागाचा सर्वांना ,
भान कशाचे नसे मना !!! 

ते लहानपण होते सुखाचे , 
मारव कधी कशी पण उडी !!

फिरून नाही येणार ती घडी , 
खेळात आनंदाची होती गोडी !!! 

@ राज पिसे 

Sunday, November 8, 2015

दिवाळीच्या प्रकाशमय शुभेच्छा !!!!!





दिवाळीच्या प्रकाशमय शुभेच्छा !!!!!
********************************
.
दिवाळीच्या दिप आणि पणती , 
.
लखलख करती अनंत जोती !! 
.
सुख समृद्धीचा संदेश सांगती ,
.
लक्ष्मीच्या पाऊलानी हो प्रगती !!!
.
दिवाळीच्या प्रकाशमय शुभेच्छा !!!!!
.
@ राज पिसे 
.

Thursday, November 5, 2015

!! अंतरीच्या प्राणपक्ष्याला !!



!! अंतरीच्या प्राणपक्ष्याला !!
***************************
मधुबनाच दर्शन नाही झालं तरी चालेल ,
तुझ्या प्रीतीच्या मधुबनातल्या झाडांची !!
सवय झालीय, अंतरीच्या प्राणपक्ष्याला ,
विचारांच्या पानाफुलांची अन रानावनाची !!! 
@ राज पिसे 

Wednesday, November 4, 2015

अतूट विश्वासाचे






!! अतूट विश्वासाचे !!
********************
तुझे आणि माझे नाते ,
ओढ आणि पवित्र भक्तीचे !!

प्रेम आणि अतूट विश्वासाचे ,
दोघाला आहे आशीर्वाद देवीचे  !!!

@ राज पिसे 

Wednesday, October 28, 2015

!! उंच भरारी घे पाखरा !!



!! उंच भरारी घे पाखरा !!
***********************

संकटात असणार वादळ वारा ,
आणि सोबत पावसाच्या धारा !!

राज सांगे इथे होवून अनामवीरा , 
शक्ती युक्तीने वाहू दे यशाचा झरा !!!
 
जिधिने ध्येय घाट नको होवू बावरा , 
बळ आहे पंखात ओलांडून जा सागरा !! 

कोणी नाही आपले का शोधतो आसरा ,
सोड मोह माया, उंच भरारी घे पाखरा !!!

@ राज पिसे 

Tuesday, October 27, 2015

!! रीत कशी हि प्रीत कशी !!



!! रीत कशी हि प्रीत कशी !!
**************************

जगाची रीत कशी हि प्रीत कशी ,

भेट जुळून आली तर गोष्ट मोठी !! 

दुरावा झाला तर हि नाती खोटी ,

विरह झाला तर आठवण मोठी !!!

@ राज पिसे 


Saturday, October 24, 2015

!! दोघे वाटसरू !!



!! दोघे वाटसरू  !!
****************

जीव गुंतला वेडा 
झाला माझा गुन्हा !
वेळी अवेळी होतो 
विरह पुन्हा पुन्हा !!
वळता वळणावर 
वाट चुकलो कशी !
होवून दोघे वाटसरू  
भेटतशील पुन्हा पुन्हा !!!

@ राज पिसे 

Sunday, October 18, 2015

!! किती अवघड !!



!! किती अवघड  !! 
************
सहज कोणात गुंतणे 
किती सोपे आहे,  
मनातले दुःख लपवणे 
किती अवघड आहे !! 

कोणा सोबत लांब 
जाने सोपे आहे,   
एकट्याने परत येणे 
किती अवघड आहे !!!  

@ राज पिसे 

Friday, October 16, 2015

!! सुख दुःखाच्या गुरुकिल्लीने !!



!! सुख दुःखाच्या गुरुकिल्लीने !! 
****************

सुख क्षणभंगुर जीवनाच्या 
अथांग सागरात कसे पोहाचे शिकवत !! 

दुःख त्यात बुडून अनमोल 
तत्वरुपी कोहिनूर काढला शिकवत !!! 

काय मिळवलं, काय गमावलं, 
कुणी जवळ केलं, कोणी दूर लोटलं !!

सुख दुःखाच्या गुरुकिल्लीने 
आयुष जगन म्हणजे काय हे समजत !!!! 

@ राज पिसे 

Wednesday, October 14, 2015

‪#‎कशी_ही_नाती_‬?




‪#‎कशी_ही_नाती_‬?
*************
नाती अशी जुळतात , 
जशी असतात अतूट !!

जन्माची नसून वाटतात , 
ती जन्मोजन्मोची अवीट !!!

सोबतीची वाटतात खुप दूर , 
दूरच्या नात्यांत प्रेम वाटे भरपूर !!

ऋणानूबंध असे कीं भावनेचा दाटे पूर . . , 
कशी ही नाती ? जवळ असून वाटे ती दूर !!!

न भेटताही जपता येतात नाती . . , 
भेट होऊन ही सोडून जातात काही नाती !!

क्षणभर भेटून देतात ओलावा आणि जिव्हाळा ही नाती .
कशी ही नाती ? भेटतात, जोडतात, सोडतात, छळतात ही नाती !!!



@ राज पिसे

!! शब्दाचा स्पर्श !!



!! शब्दाचा स्पर्श !!
*****************
काय बोलू नकळे ,
समजून घे सगळे !!
शब्दाचा स्पर्श कळे , 
मन भावनाशी खेळे !!!

हृदयाला सारे कळले ,
शब्दाविना ओठातले !!
शब्दाच्या पलीकडले , 
रहस्य मला उलगडले !!! 

@ राज पिसे 

Tuesday, October 13, 2015

!! अश्रुचा महापूर !!




!! अश्रुचा महापूर !!
********************

ताहान भूक झोप हरवून जागतात ,   
विरहाचे आपले दुख विसरण्यासाठी ,  
ह्रदयाची आग मात्र हे अश्रू विझवतात !! 

प्रेम करणाऱ्यांना दुखाची सवय होते ,
भेटीच्या वेळी आपल सुख हिरावणार ,
या संशयान दोघे मनात दुख बाळगतात !!

विरहाच्या अग्नीन सारा देह जळून जातो , 
पण जिवलग व्यक्ती सुखरूप, सुरक्षित राहो , 
या विचारांनी डोळ्यात अश्रुचा महापूर वाहतात !!! 


@ राज पिसे 

Monday, October 12, 2015

!! मन गुंतले !!




!! मन गुंतले !!
***********
नाही तू मला पाहिले , 
नाही मी तुला पाहिले !

भेटीच्या आधी आपले , 
एकमेकांचे मन गुंतले !!

सूर एकसाथ रंगले ,
तू कल्पनेत लाजले !

कोणास नाही कळले ,
कोण कोणास जिंकिले !!!

@ राज पिसे 

Sunday, October 11, 2015

!! विचारांचा, विकारांच्या लाटा !!



!! विचारांचा, विकारांच्या लाटा  !! 

 *************************

मनाच्या अथांग सागरावर 

विचारांचा, विकारांच्या लाटा  

सतत उसळत असतात !! 

ध्येय पर्यन्त पोहोचन्यासाठी 

त्यांच्या नादी न लागता 

यश गाठाचे असतात !!! 

© राज पिसे***

Thursday, October 8, 2015

!! भावनांशी संवाद !!




!! भावनांशी संवाद  !! 
*******************
हृदयाच्या भाषेला 
अक्षर ओळखीची 
गरज भासत नसते !!
.
ती थेट अंतर्मांतील 
भावनांशी संवाद 
साधत असते !!! 
.
@ राज पिसे 

Wednesday, October 7, 2015

" दारूबंदी "




" दारूबंदी "
.**************

किती कौटुंबीक हिंसाचार दारुमुळे , 
रोजच गुन्हा घड़तात दारू पिल्यामुळे !!! 
.
किती कुटुंब उदध्वस्त झाले दारुमुळे , 
किती अपधात होतात दारू पिल्यामुळे !! 
.
किती लोक मृत्यु मुखी जातात दारुमुळे ,
किती महिलांवर अत्याचार दारू पिल्यामुळे !! 
.
माणसातली माणुसकी विसरतो दारुमुळे, 
अनमोल जीव गमवतो दारुच्या व्यसनामुळे !!!!
.
© राज पिसे
.

Friday, September 18, 2015

!! म्हातारपण !!



!! म्हातारपण !!

********************

म्हातारपण सर्वाना येणार,  
आरोग्य साथ नाही देणार !
कानांनी ऐकू नाही येणार ,
दाताची जागा दाड घेणार !!

चेहर्यावर सुरकुत्या येणार , 
डोक्यावरचे केस पांढरे होणार !! 
डोळ्याने मागचे स्पष्ट दिसणार , 
पुढचे मात्र पुसट पुसट दिसणार !!
कितीही हाल झाले म्हातारपणात तरी ,  
आठवणी मात्र नेहमी तरुण असणार !! 

आयुष्यातले शेवटले दिवस कसे जाणार , 
कोणी घरी कोणी वृद्धाआश्रमात राहणार !!! 

@ राज पिसे 

Tuesday, September 15, 2015

!! लळा जीवाळा !!




!! लळा जीवाळा !!

सहज जपले कधी रडू कधी हसू ,   
क्षणात रुसणे क्षणात एक होण्याचे !!

अबोल हास्यासहित पुसले आसू , 
उरल्या रेषा मनपटलांवर आठवणीचे !!! 

दिवस ते मंतरलेले तुझ्या सोबतीचे ,
नको कसले बंधन, घुस्मटले इथे मन !! 

आठव खेळ लपंडाव आणि भातुकलीचे , 
घे तू भरारी, सुटून जातील आनंदाचे क्षण !!!  

लळा जीवाळा शब्द करे विश्वासाचा घात ,
कोणी कुणाचे नाही, जो तो आपुले पाही !!

उसवल्या गाठी विसरल्या त्या स्मृती , 
हि वाट हरवता, दिशा अंधरल्या दाही !!! 


@ राज पिसे 

Monday, September 14, 2015

!! पाऊलखुणा !!!



!! पाऊलखुणा !!!
************************

हे सुख दुख भुलविती पुन्हा , 
वाळूवर पडतील पाऊलखुणा ,
मनाच्या लाटेने वाहून जातील !! 

अंतकर्णी आठवून केला गुन्हा , 
माझ्या एकट्याच्या पाऊलखुणा ,   
भरती ओहटी ने पुसून जातील !!!  

@ राज पिसे 

Sunday, September 13, 2015

!!! मन पाखरू !!!




!!! मन पाखरू !!!

ठाऊक नसता चालत जाने रस्ते ,
थांबून मग हळूच वळणे नुसते !! 

नकळत मन क्षितिजापाशी अडते , 
आणि मन पाखरू होऊन उडते !!!
  
ऋणानुबंधाच्या असतात काही बंधने ,
भेटीच्या आनंदाने होतो मनाचे चांदणे !!

दोर मरीयादाची जखडती हे पावलांना ,
सुख दुखात एकमेकांला समजून घेणे !!! 

@ राज पिसे

Thursday, September 10, 2015

!! ओढ श्वासांना !!



!! ओढ श्वासांना !!

******************
विरल्या प्रीतीच्या संवेदना 
गाथा गिळून साऱ्या वेदना !!

गुंतता ह्रदय होतो संगम मना 
का दुरावलो आपण तू सांगना !! 

लागते तुझीच ओढ श्वासांना 
कासावीस होतो तुला बघताना !!

स्वप्न जगती उगाच निजताना 
कंप ओठांना येतो तुला स्मरताना !!!

@ राज पिसे 

Sunday, September 6, 2015

!! एका वळणावर !!



!! एका वळणावर !!
******************
तुझी आठवण ताजे करून जाते ,
ओठातले शब्द ओठातच राहाते !!

मनात आणि विचारत असते,
पण आयुष्यात काधीच नसते !!!  

डोळ्यात अश्रू दिसत नव्हते,  
पण मन मात्र भिजत होते !!

कधी भेटशील का एका वळणावर 
तरी वाट पहात राहावं असे वाटते !!!

@ राज पिसे 

!! श्वास !!





!! श्वास !!
*********
आहे जो परियंत हा श्वाशात श्वास ,
सुख दुखात घेऊ दोघे मोकळा श्वास !!

माझ्या आदी तुटला कधी तुझा श्वास ,
तर तुझ्या श्वासामाघे सोडीन मी श्वास !!!

@ राज पिसे

!! अखंड विश्वास !!







!! अखंड विश्वास !!
******************

दोघात चालतो एकच श्वास ,
म्हणून असते भेटीची आस !!

नसे हा कधी आभासी भास ,
मनात तेवतो अखंड विश्वास !!!

@ राज पिसे 

Saturday, September 5, 2015

!! शृंगारवेडी निशा !!



!! शृंगारवेडी निशा !!
****************

किती आठवणी मनी साठवू ,
गंध दरवळे अंगावर माझ्या !!

आता आली शृंगारवेडी निशा ,
नकळत मिळता नजरा तुझ्या !!!

@ राज पिसे 

Friday, September 4, 2015

!!! आभासातून भास !!




!!! आभासातून भास !! 

***********************
परतीच्या वाटेवर पावले घुटमळते , 
मनात स्नेहाचा सुगंध दळवळते !! 
आभासातून भास तुझा उमगते ,
ह्रदयी आठवणीचे फुल उमलते !!!

एकांतात शब्द अबोल राहाते ,
हिरव्यागार कुरणी फुल फुलते !!   
जीवाचे पाखरू केविलवाणे होते ,
कोणाला सांगावे मूक वेदना सलते !!!
 
@ राज पिसे 

Wednesday, September 2, 2015

!! निशब्दाच्या कुशीत !!



!! निशब्दाच्या कुशीत !!
************************
मन माझे कि तुझे नाही कळले , 
निशब्दाच्या कुशीत भास उरले !!

शब्द कधी येईल ओठी मनातले ,
डोळ्यांच्या अश्रुनेच अंकुर फुटले !!!

ओढ तुझी श्वास माझा ह्रदयी दाटले , 
सर्व काही तुझ्या मनासारखे घडले !!

व्याकूळ कातरवेळी सूरही कसे जुळले ,
विसरू नको गीत भावनेचे ओठावरले !!!


@ राज पिसे 

!! ह्रदयांची सूर गाथा !!



!! ह्रदयांची सूर गाथा !! 

***********************
पाखरे उडून जातात आणि ओळख हि विसरतात , 
जीवापाड जीव लावून हे मनात नाते जुळून जातात  !! 
घडल्या भेटी मोहरल्या ओटी त्या स्मृती ठेवूनी जातात , 
आपल्या जुळल्या ह्रदयांची सूर गाथा अजून हि गातात !!! 

******** राज पिसे 

Tuesday, September 1, 2015

!! मी राधा मीच कृष्ण !!




!! मी राधा मीच कृष्ण !!
.
जेव्हा तुला पहिले, 
अंतरीचे गीत उमगले !

मंत्र मुग्ध मोहरले, 
मिलनासी मी आतुरले !!
.
मन माझे भुलले, 
शतजन्मीचे नाते जुळले !

मी राधा मीच कृष्ण, 
तुझ्या प्रेमात एकरूप झाले !!!
.
@ राज पिसे

Sunday, August 30, 2015

!! क्षितिज !!


!! क्षितिज !!
पंख फुटताच  निर्भय व्हावे ,
      वादळात विचलित नाही व्हावे !!
        आठवणी स्मरण संगती न्हावे ,
            झेप घेता क्षितिज दूर पाळावे !!!
                         @ राज पिसे 

Friday, August 28, 2015

!! हळव्या रेशीमगाठी !!





!! हळव्या रेशीमगाठी !! 

बांधले रेशीम धागे रक्षाबंधनाला
भावाने बहिणीच्या रक्षणासाठी  !!

मायेच अजोड प्रीतीचे तुझ्यासाठी   
ह्या तर आहे हळव्या रेशीमगाठी !! 

@ राज पिसे 

!! रक्षाबंधन !!



!! रक्षाबंधन !! 

रक्षाबंधन हे सण  ऋणानुबंधनाचे,
विसरला भाऊ कर्तव्य तुझ्या रक्षणाचे !!

या कलियुगात तूच कर रक्षण स्वताचे,
हो तूच हिरकणी दाखव रूप तुझे शक्तीचे !!!!