Wednesday, October 14, 2015

‪#‎कशी_ही_नाती_‬?




‪#‎कशी_ही_नाती_‬?
*************
नाती अशी जुळतात , 
जशी असतात अतूट !!

जन्माची नसून वाटतात , 
ती जन्मोजन्मोची अवीट !!!

सोबतीची वाटतात खुप दूर , 
दूरच्या नात्यांत प्रेम वाटे भरपूर !!

ऋणानूबंध असे कीं भावनेचा दाटे पूर . . , 
कशी ही नाती ? जवळ असून वाटे ती दूर !!!

न भेटताही जपता येतात नाती . . , 
भेट होऊन ही सोडून जातात काही नाती !!

क्षणभर भेटून देतात ओलावा आणि जिव्हाळा ही नाती .
कशी ही नाती ? भेटतात, जोडतात, सोडतात, छळतात ही नाती !!!



@ राज पिसे

1 comment:

  1. अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुलेना
    मिटले तसेच ओठ की पाकळी हलेना

    समजूत मी करावी म्हणुनीच तू रुसावे
    मी हांस सांगताच, रडतांही तू हसावे
    ते आज का नसावे, समजावणी पटेना
    धरिला असा अबोला की बोल बोलवेना

    का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे
    विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे
    चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना

    की गूढ काही डाव, वरचा न हा तरंग
    घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग
    रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना
    अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुलेना

    ReplyDelete