आठवणीचा महापूर !!!




                    आठवणीचा महापूर !!!

भर वेगात गाडी येत होती…. एक स्त्री हवेच्या वेगानी आली… 
रोड वर निर्भिस्त खेळत बाळाला उचलून घेत… 
रोड शेजारी झाडा खाली त्याला मायेने कुळवाळत होती 
माझा तर काळजाचा ठोकाच चुकला….!!! 

सर्वच लोक थक झाले एका जीवा साठी दुसरे जीव तळमळतानी बघत… 
सर्वांचे अश्रू डोळ्यात पाणावले…  ती घटना आठवता अंगावर शहारे येतात … 
घटना घडली गर्दी जमली…  लोकांनी तिची स्तुती केली …. 
तिचे दुख तिला माहित …. नंतर गर्दी ओसरली… 

तिला वेडी समजून तिची कोणी दखल नाही घेतली… 
मी मात्र स्थांब उभा होतो… मला कळलेच नाही हे असे अचानक काय घडले… 
कारण ते तिचे बाळ नोहतेच….  रोड शेजारी ३-४  झोपडी होती त्यातच एकाचे ते बाळ होते … 
मला मात्र चैन नाही का ती वेडी झाली हे जाणून घेण्याची ओढ लागली 
ज्यांचे बाळ त्याचं विचारले हि वेडी आहे मग कसे का एवडे धाडस… 
हवेच्या वेगाने गाडी पुढचे बाळ उचलले तिने…. 

त्या ग्रस्थानी सांगितले… हिचे लग्न एका मिल्ट्री जवाना सोबत २ वर्षा आदी झाले… 
आनंदी संसार होता…तो तिला देश भक्तीचे धडे गिरवत होता…. 
हिला पण देश प्रेम जगले…  
बोर्डर वरून बुलावा आला आणी हिचा यजमान देश सेवे साठी उत्साहित निघाला …। 
तिने त्याला ओल्या डोळ्यांनी bye bye केले … 

काळाला तर निमित हवे सुखी संसाराला वियोग देण्यासाठी… 
एकदिवशी सकाळी निरोप आला तिचा यजमान बोर्डर वर देशासाठी शहीद झाला 
निरोप सोबत शहिदाचे दुर्स्याच दिवशी शव पण आले… ती तर भानावर नोव्ह्ती… 
दुःखाचे डोंगर खूप मोठे होत चालले…. घरच्यांनी तिलाच दोषी ठरवत … 
माउलीला उंबरडा बाहेर काढले…. 

बाहेर शहिदासाठी निसर्ग पाऊसानी श्रद्धाजंली वाहत होता… 


आणि माउली भर पाऊसात एकटीच निघाली… बिन सहर्यानी…  

संसाराची नाव किनारा मिळण्या आदीच बुडाली होती… 
आता ती एकटीच जीवनाच्या नावे मध्ये राहाली होती…
तिच्या सोबत तिच्या घडल्या क्षणाचा आठवणीचा महापूर… 
कळत नाही, कोणाला दिल्या शब्दासाठी एकटीच वाहत होती….  

जुन्या साडी मध्ये नवीन कपड्या सोबत आठवणीचे घाठोडे बाधून इथेच राहाते… 
सर्व नाते गोते माघे विसरले… लोकांनी वेडे म्हणून सोडिले…. 

पण आज हि बहुतेक तिच्या यजमानाला दिला शब्द ती पाळत  आहे… 
बोर्डर वर नाही पण इथेच देशात राहून आपल्या देशाची सेवा करत आहे…. 

जग तिला वेडी म्हणे पण ती याच जगात घडले क्षण सोधत आहे…. 
विरहात आहे कि, ती आपल्या यजमानाची वाट पाहत आहे 
देश भक्तीची जिद मनात बाळगत आहे… आज पण ती स्पुर्ती आहे… 

आज पण ते क्षण आठवता अंगावर शहारे येतात …। 
काळजाचा ठोका चुकतो आणि हृदयाला स्पर्श जाणवतो….  

@ राज पिसे

1 comment:

  1. संसाराची नाव किनारा मिळण्या आदीच बुडाली होती…
    आता ती एकटीच जीवनाच्या नावे मध्ये राहाली होती…
    तिच्या सोबत तिच्या घडल्या क्षणाचा आठवणीचा महापूर…
    कळत नाही, कोणाला दिल्या शब्दासाठी एकटीच वाहत होती….

    ReplyDelete