Sunday, March 26, 2017

हिंदू नववर्षाच्या गुडीपाडव्यांचा हार्दिक शुभेच्छा !!


** गुडीपाडवा **

सुख समृद्धीची गुढी ,
नवीन पल्लवी वृषलतांची !
आप्तेष्टांच्या गाठीभेटी ,
नवीन आशा नववर्षाची !!

चांगले विचार यावे ,
चांगले आरोग्य राहावे !
सर्वांना आनंदीत बघून ,
डोळ्यांचे पारडे फिटावे !!

       @ राज पिसे...✍

Friday, February 24, 2017

***** प्रेम *****

**** प्रेम ****

*******************
ऋणानुबंधाच्या नात्याला
जीवापाड जीव लावा ।

दुराव्यात हि असते
प्रेमाचा ओलावा ।।

@ राज पिसे..✍

Wednesday, February 22, 2017

*** गैर ****


आपलेच दुःखावर चोळती मीठ ,

नात्यात काटे पेरत जातात ।।

गैर होतात आपले कित्येकदा,

नाते नसून संकटात उभे राहतात ।।

          @ राज पिसे....✍

Tuesday, February 21, 2017

****तुझ्यात जीव रंगला****

*** तुझ्यात जीव रंगला ***

********************************

आयुष्याच्या वळणावर तू मला भेटता,
बहरले जीवन माझे साथ तुझी मिळता ।

तुझ्यात जीव रंगला तू वाटसरू माझी,
वेडु म्हणतेस तू तुझ्यावर प्रेम व्यक्त करता ।।

कुठलाच क्षण नाही त्यात आठवण तुझी नसते,
तुला साठवलेस मनात हृदयी तू विराजते ।

आठवते रोज ती भेट आपली पुलावरली,
डोळ्यात डोळे आणि हातात हात गुंतलेली ।

रोज आठवते तू मला, आठवता अश्रू थांबत नाही,
मनात बसलेल्या अथांग प्रेमाच्या सागरास थांग नाही ।।
   
                                          .....राज पिसे....✍

Sunday, February 19, 2017

।। कला ।।

।। कला ।।

मनातला आनंद, वेदना
व्यक्त करायला कला लागते ।।
  आणि कलेला व्यक्त करायला
   कुठलीच अट नसते ।।।

               राज पिसे....