Wednesday, October 28, 2015

!! उंच भरारी घे पाखरा !!



!! उंच भरारी घे पाखरा !!
***********************

संकटात असणार वादळ वारा ,
आणि सोबत पावसाच्या धारा !!

राज सांगे इथे होवून अनामवीरा , 
शक्ती युक्तीने वाहू दे यशाचा झरा !!!
 
जिधिने ध्येय घाट नको होवू बावरा , 
बळ आहे पंखात ओलांडून जा सागरा !! 

कोणी नाही आपले का शोधतो आसरा ,
सोड मोह माया, उंच भरारी घे पाखरा !!!

@ राज पिसे 

Tuesday, October 27, 2015

!! रीत कशी हि प्रीत कशी !!



!! रीत कशी हि प्रीत कशी !!
**************************

जगाची रीत कशी हि प्रीत कशी ,

भेट जुळून आली तर गोष्ट मोठी !! 

दुरावा झाला तर हि नाती खोटी ,

विरह झाला तर आठवण मोठी !!!

@ राज पिसे 


Saturday, October 24, 2015

!! दोघे वाटसरू !!



!! दोघे वाटसरू  !!
****************

जीव गुंतला वेडा 
झाला माझा गुन्हा !
वेळी अवेळी होतो 
विरह पुन्हा पुन्हा !!
वळता वळणावर 
वाट चुकलो कशी !
होवून दोघे वाटसरू  
भेटतशील पुन्हा पुन्हा !!!

@ राज पिसे 

Sunday, October 18, 2015

!! किती अवघड !!



!! किती अवघड  !! 
************
सहज कोणात गुंतणे 
किती सोपे आहे,  
मनातले दुःख लपवणे 
किती अवघड आहे !! 

कोणा सोबत लांब 
जाने सोपे आहे,   
एकट्याने परत येणे 
किती अवघड आहे !!!  

@ राज पिसे 

Friday, October 16, 2015

!! सुख दुःखाच्या गुरुकिल्लीने !!



!! सुख दुःखाच्या गुरुकिल्लीने !! 
****************

सुख क्षणभंगुर जीवनाच्या 
अथांग सागरात कसे पोहाचे शिकवत !! 

दुःख त्यात बुडून अनमोल 
तत्वरुपी कोहिनूर काढला शिकवत !!! 

काय मिळवलं, काय गमावलं, 
कुणी जवळ केलं, कोणी दूर लोटलं !!

सुख दुःखाच्या गुरुकिल्लीने 
आयुष जगन म्हणजे काय हे समजत !!!! 

@ राज पिसे 

Wednesday, October 14, 2015

‪#‎कशी_ही_नाती_‬?




‪#‎कशी_ही_नाती_‬?
*************
नाती अशी जुळतात , 
जशी असतात अतूट !!

जन्माची नसून वाटतात , 
ती जन्मोजन्मोची अवीट !!!

सोबतीची वाटतात खुप दूर , 
दूरच्या नात्यांत प्रेम वाटे भरपूर !!

ऋणानूबंध असे कीं भावनेचा दाटे पूर . . , 
कशी ही नाती ? जवळ असून वाटे ती दूर !!!

न भेटताही जपता येतात नाती . . , 
भेट होऊन ही सोडून जातात काही नाती !!

क्षणभर भेटून देतात ओलावा आणि जिव्हाळा ही नाती .
कशी ही नाती ? भेटतात, जोडतात, सोडतात, छळतात ही नाती !!!



@ राज पिसे

!! शब्दाचा स्पर्श !!



!! शब्दाचा स्पर्श !!
*****************
काय बोलू नकळे ,
समजून घे सगळे !!
शब्दाचा स्पर्श कळे , 
मन भावनाशी खेळे !!!

हृदयाला सारे कळले ,
शब्दाविना ओठातले !!
शब्दाच्या पलीकडले , 
रहस्य मला उलगडले !!! 

@ राज पिसे 

Tuesday, October 13, 2015

!! अश्रुचा महापूर !!




!! अश्रुचा महापूर !!
********************

ताहान भूक झोप हरवून जागतात ,   
विरहाचे आपले दुख विसरण्यासाठी ,  
ह्रदयाची आग मात्र हे अश्रू विझवतात !! 

प्रेम करणाऱ्यांना दुखाची सवय होते ,
भेटीच्या वेळी आपल सुख हिरावणार ,
या संशयान दोघे मनात दुख बाळगतात !!

विरहाच्या अग्नीन सारा देह जळून जातो , 
पण जिवलग व्यक्ती सुखरूप, सुरक्षित राहो , 
या विचारांनी डोळ्यात अश्रुचा महापूर वाहतात !!! 


@ राज पिसे 

Monday, October 12, 2015

!! मन गुंतले !!




!! मन गुंतले !!
***********
नाही तू मला पाहिले , 
नाही मी तुला पाहिले !

भेटीच्या आधी आपले , 
एकमेकांचे मन गुंतले !!

सूर एकसाथ रंगले ,
तू कल्पनेत लाजले !

कोणास नाही कळले ,
कोण कोणास जिंकिले !!!

@ राज पिसे 

Sunday, October 11, 2015

!! विचारांचा, विकारांच्या लाटा !!



!! विचारांचा, विकारांच्या लाटा  !! 

 *************************

मनाच्या अथांग सागरावर 

विचारांचा, विकारांच्या लाटा  

सतत उसळत असतात !! 

ध्येय पर्यन्त पोहोचन्यासाठी 

त्यांच्या नादी न लागता 

यश गाठाचे असतात !!! 

© राज पिसे***

Thursday, October 8, 2015

!! भावनांशी संवाद !!




!! भावनांशी संवाद  !! 
*******************
हृदयाच्या भाषेला 
अक्षर ओळखीची 
गरज भासत नसते !!
.
ती थेट अंतर्मांतील 
भावनांशी संवाद 
साधत असते !!! 
.
@ राज पिसे 

Wednesday, October 7, 2015

" दारूबंदी "




" दारूबंदी "
.**************

किती कौटुंबीक हिंसाचार दारुमुळे , 
रोजच गुन्हा घड़तात दारू पिल्यामुळे !!! 
.
किती कुटुंब उदध्वस्त झाले दारुमुळे , 
किती अपधात होतात दारू पिल्यामुळे !! 
.
किती लोक मृत्यु मुखी जातात दारुमुळे ,
किती महिलांवर अत्याचार दारू पिल्यामुळे !! 
.
माणसातली माणुसकी विसरतो दारुमुळे, 
अनमोल जीव गमवतो दारुच्या व्यसनामुळे !!!!
.
© राज पिसे
.