Friday, September 18, 2015

!! म्हातारपण !!



!! म्हातारपण !!

********************

म्हातारपण सर्वाना येणार,  
आरोग्य साथ नाही देणार !
कानांनी ऐकू नाही येणार ,
दाताची जागा दाड घेणार !!

चेहर्यावर सुरकुत्या येणार , 
डोक्यावरचे केस पांढरे होणार !! 
डोळ्याने मागचे स्पष्ट दिसणार , 
पुढचे मात्र पुसट पुसट दिसणार !!
कितीही हाल झाले म्हातारपणात तरी ,  
आठवणी मात्र नेहमी तरुण असणार !! 

आयुष्यातले शेवटले दिवस कसे जाणार , 
कोणी घरी कोणी वृद्धाआश्रमात राहणार !!! 

@ राज पिसे 

Tuesday, September 15, 2015

!! लळा जीवाळा !!




!! लळा जीवाळा !!

सहज जपले कधी रडू कधी हसू ,   
क्षणात रुसणे क्षणात एक होण्याचे !!

अबोल हास्यासहित पुसले आसू , 
उरल्या रेषा मनपटलांवर आठवणीचे !!! 

दिवस ते मंतरलेले तुझ्या सोबतीचे ,
नको कसले बंधन, घुस्मटले इथे मन !! 

आठव खेळ लपंडाव आणि भातुकलीचे , 
घे तू भरारी, सुटून जातील आनंदाचे क्षण !!!  

लळा जीवाळा शब्द करे विश्वासाचा घात ,
कोणी कुणाचे नाही, जो तो आपुले पाही !!

उसवल्या गाठी विसरल्या त्या स्मृती , 
हि वाट हरवता, दिशा अंधरल्या दाही !!! 


@ राज पिसे 

Monday, September 14, 2015

!! पाऊलखुणा !!!



!! पाऊलखुणा !!!
************************

हे सुख दुख भुलविती पुन्हा , 
वाळूवर पडतील पाऊलखुणा ,
मनाच्या लाटेने वाहून जातील !! 

अंतकर्णी आठवून केला गुन्हा , 
माझ्या एकट्याच्या पाऊलखुणा ,   
भरती ओहटी ने पुसून जातील !!!  

@ राज पिसे 

Sunday, September 13, 2015

!!! मन पाखरू !!!




!!! मन पाखरू !!!

ठाऊक नसता चालत जाने रस्ते ,
थांबून मग हळूच वळणे नुसते !! 

नकळत मन क्षितिजापाशी अडते , 
आणि मन पाखरू होऊन उडते !!!
  
ऋणानुबंधाच्या असतात काही बंधने ,
भेटीच्या आनंदाने होतो मनाचे चांदणे !!

दोर मरीयादाची जखडती हे पावलांना ,
सुख दुखात एकमेकांला समजून घेणे !!! 

@ राज पिसे

Thursday, September 10, 2015

!! ओढ श्वासांना !!



!! ओढ श्वासांना !!

******************
विरल्या प्रीतीच्या संवेदना 
गाथा गिळून साऱ्या वेदना !!

गुंतता ह्रदय होतो संगम मना 
का दुरावलो आपण तू सांगना !! 

लागते तुझीच ओढ श्वासांना 
कासावीस होतो तुला बघताना !!

स्वप्न जगती उगाच निजताना 
कंप ओठांना येतो तुला स्मरताना !!!

@ राज पिसे 

Sunday, September 6, 2015

!! एका वळणावर !!



!! एका वळणावर !!
******************
तुझी आठवण ताजे करून जाते ,
ओठातले शब्द ओठातच राहाते !!

मनात आणि विचारत असते,
पण आयुष्यात काधीच नसते !!!  

डोळ्यात अश्रू दिसत नव्हते,  
पण मन मात्र भिजत होते !!

कधी भेटशील का एका वळणावर 
तरी वाट पहात राहावं असे वाटते !!!

@ राज पिसे 

!! श्वास !!





!! श्वास !!
*********
आहे जो परियंत हा श्वाशात श्वास ,
सुख दुखात घेऊ दोघे मोकळा श्वास !!

माझ्या आदी तुटला कधी तुझा श्वास ,
तर तुझ्या श्वासामाघे सोडीन मी श्वास !!!

@ राज पिसे

!! अखंड विश्वास !!







!! अखंड विश्वास !!
******************

दोघात चालतो एकच श्वास ,
म्हणून असते भेटीची आस !!

नसे हा कधी आभासी भास ,
मनात तेवतो अखंड विश्वास !!!

@ राज पिसे 

Saturday, September 5, 2015

!! शृंगारवेडी निशा !!



!! शृंगारवेडी निशा !!
****************

किती आठवणी मनी साठवू ,
गंध दरवळे अंगावर माझ्या !!

आता आली शृंगारवेडी निशा ,
नकळत मिळता नजरा तुझ्या !!!

@ राज पिसे 

Friday, September 4, 2015

!!! आभासातून भास !!




!!! आभासातून भास !! 

***********************
परतीच्या वाटेवर पावले घुटमळते , 
मनात स्नेहाचा सुगंध दळवळते !! 
आभासातून भास तुझा उमगते ,
ह्रदयी आठवणीचे फुल उमलते !!!

एकांतात शब्द अबोल राहाते ,
हिरव्यागार कुरणी फुल फुलते !!   
जीवाचे पाखरू केविलवाणे होते ,
कोणाला सांगावे मूक वेदना सलते !!!
 
@ राज पिसे 

Wednesday, September 2, 2015

!! निशब्दाच्या कुशीत !!



!! निशब्दाच्या कुशीत !!
************************
मन माझे कि तुझे नाही कळले , 
निशब्दाच्या कुशीत भास उरले !!

शब्द कधी येईल ओठी मनातले ,
डोळ्यांच्या अश्रुनेच अंकुर फुटले !!!

ओढ तुझी श्वास माझा ह्रदयी दाटले , 
सर्व काही तुझ्या मनासारखे घडले !!

व्याकूळ कातरवेळी सूरही कसे जुळले ,
विसरू नको गीत भावनेचे ओठावरले !!!


@ राज पिसे 

!! ह्रदयांची सूर गाथा !!



!! ह्रदयांची सूर गाथा !! 

***********************
पाखरे उडून जातात आणि ओळख हि विसरतात , 
जीवापाड जीव लावून हे मनात नाते जुळून जातात  !! 
घडल्या भेटी मोहरल्या ओटी त्या स्मृती ठेवूनी जातात , 
आपल्या जुळल्या ह्रदयांची सूर गाथा अजून हि गातात !!! 

******** राज पिसे 

Tuesday, September 1, 2015

!! मी राधा मीच कृष्ण !!




!! मी राधा मीच कृष्ण !!
.
जेव्हा तुला पहिले, 
अंतरीचे गीत उमगले !

मंत्र मुग्ध मोहरले, 
मिलनासी मी आतुरले !!
.
मन माझे भुलले, 
शतजन्मीचे नाते जुळले !

मी राधा मीच कृष्ण, 
तुझ्या प्रेमात एकरूप झाले !!!
.
@ राज पिसे