Tuesday, December 1, 2015

!! कल्पनांचा सागर !!




!! कल्पनांचा सागर !!
***********************
स्वप्ने बघण्याची शक्ती जागृत असेल   
तर नेहमी चंगले नवे सामर्थ्य मिळेल !! 

हे सामर्थ्य आपल्या जवळ भरपूर आहे   
याची आपल्याला कधी कल्पनाही नसेल !!!

आयुष्यात न वापरलेला शक्तीसाठा 
प्रत्येका जवळ सुप्त अवस्थेत असतो !!

जर हा शक्तीसाठा उपयोगात आणला 
तर स्वप्ने साकार व अपूर्व यश मिळतो !!!
    
मन म्हणजे विविध कल्पनांचा सागर असते 
आपल्या कल्पनाच आपले भवितव्य घडवते !!

सुख दुःख आपल्या मनाच्या ताब्यात असते 
आपल्याच स्वप्नातून सुख दुःख निर्माण होते !!!

असंतोष, विसंवाद, द्वेष, मत्सर, निराशा 
अस्वस्थता, चिंता, काळजी, भीती नसेल !!

तर अवर्णीय सोंदर्य, आनंद, समाधान 
प्रेमभावना, आपुलकी चमकत असेल !!!

@ राज पिसे