Tuesday, February 21, 2017

****तुझ्यात जीव रंगला****

*** तुझ्यात जीव रंगला ***

********************************

आयुष्याच्या वळणावर तू मला भेटता,
बहरले जीवन माझे साथ तुझी मिळता ।

तुझ्यात जीव रंगला तू वाटसरू माझी,
वेडु म्हणतेस तू तुझ्यावर प्रेम व्यक्त करता ।।

कुठलाच क्षण नाही त्यात आठवण तुझी नसते,
तुला साठवलेस मनात हृदयी तू विराजते ।

आठवते रोज ती भेट आपली पुलावरली,
डोळ्यात डोळे आणि हातात हात गुंतलेली ।

रोज आठवते तू मला, आठवता अश्रू थांबत नाही,
मनात बसलेल्या अथांग प्रेमाच्या सागरास थांग नाही ।।
   
                                          .....राज पिसे....✍

No comments:

Post a Comment