Tuesday, September 15, 2015

!! लळा जीवाळा !!




!! लळा जीवाळा !!

सहज जपले कधी रडू कधी हसू ,   
क्षणात रुसणे क्षणात एक होण्याचे !!

अबोल हास्यासहित पुसले आसू , 
उरल्या रेषा मनपटलांवर आठवणीचे !!! 

दिवस ते मंतरलेले तुझ्या सोबतीचे ,
नको कसले बंधन, घुस्मटले इथे मन !! 

आठव खेळ लपंडाव आणि भातुकलीचे , 
घे तू भरारी, सुटून जातील आनंदाचे क्षण !!!  

लळा जीवाळा शब्द करे विश्वासाचा घात ,
कोणी कुणाचे नाही, जो तो आपुले पाही !!

उसवल्या गाठी विसरल्या त्या स्मृती , 
हि वाट हरवता, दिशा अंधरल्या दाही !!! 


@ राज पिसे 

No comments:

Post a Comment