Thursday, September 10, 2015

!! ओढ श्वासांना !!



!! ओढ श्वासांना !!

******************
विरल्या प्रीतीच्या संवेदना 
गाथा गिळून साऱ्या वेदना !!

गुंतता ह्रदय होतो संगम मना 
का दुरावलो आपण तू सांगना !! 

लागते तुझीच ओढ श्वासांना 
कासावीस होतो तुला बघताना !!

स्वप्न जगती उगाच निजताना 
कंप ओठांना येतो तुला स्मरताना !!!

@ राज पिसे 

No comments:

Post a Comment